Monday, June 10, 2024

चित्रबलाक / रंगीतबलाक इंग्रजी नाव: Painted stork शास्त्रीय नाव: Mycteria leucocephala)

 चित्रबलाक / रंगीतबलाक 

इंग्रजी नाव: Painted stork

शास्त्रीय नाव: Mycteria leucocephala



हा आशिया खंडातील निवासी पक्षी असून भारत, नेपाळ, म्यानमार, थायलंड, बांग्लादेश, कंबोडिया, लाओस,  पाकिस्तान, श्रीलंका या देशांमध्ये आढळतो. तळी, दलदलीच्या जागा आणि भातशेती अशा ठिकाणी या पक्ष्यांचा वावर असतो. चित्रबलाक हा पक्षी बगळा किंवा रोहित पक्षी याच कुळातील आहे. त्यामुळे हे पक्षी मोठ्या संख्येने रोहित पक्षी विविध बगळ्यांच्या बरोबरीने वावरताना दिसतात. मानदेशात जवळजवळ सर्व प्रकारच्या जलाशयांवर मोठ्या संख्येने हे पक्षी आढळून येतात. उन्हाळ्यात तलावांचे व बंधाऱ्यांचे पाणी  कमी झाल्यामुळे छोटी छोटी डबकी तयार होतात ज्याध्ये मोठमोठे  मासे सहज सापडतात त्यामुळे चित्रबलाक  हे पक्षी मोठ्या संख्येने गर्दीकरून पाण्यात मासे पकडताना दिसून येतात. आणि याच दरम्यान त्यांच्या पंखांवरील लाल छटा अधिकच उठून दिसतात. कधी कधी बहुतांश लोक याला रोहित पक्षी समजतात त्यामुळेच हे पक्षी पहाण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसून येतात.

चित्रबलाक उंच व सडपातळ असून नर मादी दिसायाला सारखीच असतात. मात्र मादी नरापेक्षा थोडी लहान असते. या पक्ष्याची उंची साधारणतः १ मी. पर्यन्त असते.  आणि वजन २-३.५ किग्रॅ. असते. पाठीवरील पिसे पांढरी असून पंख आणि छातीवरील पिसांवर हिरवट काळ्या रंगाच्या खुणा असतात. पाठीवरच्या पिसांच्या टोकांकडील भाग गुलाबी असतो. जो सामान्य नागरिकांचे लक्ष वेधून घेतो. त्यांच्या पायांवर पिवळ्या व लाल रंगाच्या छटा असतात. डोक्याचा थोडासाच भाग पिसांनी झाकलेला असून त्यांचा रंग फिकट केशरी असतो. मादी नरापेक्षा किंचित लहान असते. चोच लांब, बाकदार व मजबूत असून रंगाने पिवळी असते. या चोचीच्या मदतीने उथळ पाण्यात अन्न शोधतात. खाद्य पकडताना ते आपले डोके पाण्यात बुडवून चोच अर्धवट उघडी ठेवतात, डोके हलवत राहतात आणि चोचीला लागलेले मासे झटकन पकडतात. तर दुसऱ्या बाजूला आपल्या पाण्याच्या तळाशी पायाने पाणी ढवळत असतात.  त्यामुळे तळाशी असलेले मासे पृष्ठभागावर येतात. ते मासे हा पक्षी आपल्या बाकदार चोचीने पकडतात. चित्रबलाक पक्ष्यांचे प्रमुख अन्न मासे असले तरी बेडूक, गोगलगाई, इ. प्राणीसुद्धा ते खात असतात.

चित्रबलाक पक्ष्याचा विणीचा हंगाम भागानुसार वेगवेगळा असतो असे अनेक पक्षी निरीक्षकांनी नमूद केले आहे.  मात्र मानदेशांतील पावसाळा संपत आला की चित्रबलाकांचा विणीचा हंगाम सुरू होतो. या हंगामात त्यांच्या शरीराचे रंग अधिकच गडद व उठून दिसतात. मादीला आकर्षित करण्यासाठी नर पंख साफ करतात व हवेत उडतात व आपल्या लालबुंद गुलाबी पंखांचे प्रदर्शन करीत असतात. नर मंदीचे मिलन झाले नंतर दोघे मिळून उंच झाडाच्या टोकावर घरटे बांधतात. या घरट्यात मादी ३५  पांढऱ्या रंगाची अंडी घालते. साधारणतः २७ ते ३२ दिवस अंडी उबवल्यानंतर पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात. नर-मादी मिळून पिलांचे संगोपन करतात.

मानदेशातील बहुतांश जलाशय उन्हाळ्यात कोरडे पडतात. त्यामुळे हे पक्षी इतरत्र स्थलांतरित होतात किंवा काही प्राणी चित्रबलाकची शिकार करतात. 

No comments:

पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे Mandesh for Bird Watchers and Travelers

                      पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे माण नदी खोऱ्यात येणाऱ्या भौगोलिक प्रदेशाला ‘ माणदे...