Monday, June 10, 2024

वारकरी / नाम्या इंग्रजी नाव : Coot शास्त्रीय नाव : Fulica atra

 वारकरी / नाम्या

इंग्रजी नाव : Coot

शास्त्रीय नाव : Fulica atra



गोड्या पाण्याच्या जलाश्यांवर हमखास दिसणारा व पक्षीप्रेमीना आकर्षित करणारा कोंबडी पेक्षा लहान आणि बदकासारखा दिसणारा व पोहणारा वारकरी पक्षी सतत पाण्यात पोहताना आणि भक्ष्य शोधताना दिसून येतो. या पक्ष्यांचे डोके काळे असते आणि चोच हस्तिदंतसारखी पांढरी शुभ्र असते.  ज्या पद्धतीने पंढरीचे वारकरी आपल्या कपाळावर पांढरा टिळा लावतात, अगदी तसेच त्यांचे डोके वाटते म्हणून याला वारकरी किंवा नाम्या म्हणून संबोधले जाते. वारकरी पक्षी समूहाने पाण्यात पोहत असतात. त्यासाठी त्यांच्या पायाच्या बोटांमध्ये पातळ त्वचा असते पोहताना ज्याचा उपयोग वल्हयासारखा करतात.  भारत आणि श्रीलंका देशात  वारकरी हा स्थानिक पक्षी असून अंटार्क्टिका वगळता जगभर आढळतो. युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतील अनेक भागांमध्ये ही हा पक्षी मोठ्या संख्येने आढळतो.

वारकरी पक्षी मिश्रहारी असून त्यांच्या आहारात पाणवनस्पती , ते जलीय वनस्पती, कीटक, लहान मासे, आणि उभयचर प्राणी हे यांचे आहार घेतायांचा समावेश आहार असतो.  वारकरी पक्षी इतर पाण्यातील पक्ष्यांची अंडी, शैवाल, बियाणे, आणि फळे खाण्यासाठीही प्रसिद्ध आहेत. जलाशयांच्या काठावरील  जमिनीवर ते वनस्पती खातात.  ते विविध प्रकारे खाद्य शोधण्यासाठी खूप प्रयत्नशील असतात.  जसे की पाण्याखाली ७ ते ८ मीटरपर्यंत बुडी मारतात आणि अन्न शोधण्यासाठी सुमारे १५ ते २०  सेकंद पाण्याखाली राहू शकतात.

विणीच्या हंगामात वारकरी पक्षी खूप आक्रमत होतात. आपल्या घरट्याला धोका आहे असे जानवल्यास वारकरी पक्षी प्राण्यांवर हल्ला करताना दिसून येतात. हे पक्षी जलाशयाच्या काठावर किंवा तरंगत्या वनस्पती, किंवा झाडांच्या खोडावर  गवत काड्या आणि वनस्पतीच्या पानांचा आणि काटक्यांचा वापर करून सुंदर घरटे बनवतात. नर आपले घरटे मऊ पिसांनी सजवतो. .

वारकरी पक्ष्यांचा विणीचा हंगाम मार्च ते जुलै असतो. मादी विणीच्या हंगामात दोन वेळा अंडी घालते. या घरट्यात काळ्या रंगाचे ठिपके असलेली फिक्कट रंगाची ४ ते ९ अंडी घालते. साधारणतः २१ ते २४ दिवस नर मादी आळीपाळीने अंडी उबवतात. अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यानंतर माता-पिता पिल्लाचे संगोपन करतात. साधारणतः ८ ते ११ आठवड्यात पिल्ले उडून जाण्यासाठी सक्षम होतात. परंतु पिल्ले १४ आठवड्यापर्यन्त घरट्याच्या आसपासच वावरतात.

 

No comments:

पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे Mandesh for Bird Watchers and Travelers

                      पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे माण नदी खोऱ्यात येणाऱ्या भौगोलिक प्रदेशाला ‘ माणदे...