Sunday, April 12, 2026

मलबार मैना किंवा करड्या डोक्याची मैना (Chestnut-tailed starling)

मलबार मैना  किंवा  करड्या डोक्याची  मैना

शास्त्रीय नाव - Sturnia malabarica,

इंग्रजी नाव - Chestnut-tailed starling

महाराष्ट्रात अत्यंत दुर्मिळ असणारा हा पक्षी मानदेशातिल सांगोला सारख्या दुष्काळी भागात आढळणे ही खूपच दुर्मिळ बाब आहे.  मात्र मला तो माझ्या कॅमेराने टिपता आला हेच खूप विशेष. तोच करड्या डोक्याची मैनाची अधिक माहिती वाचा.)    

            करड्या डोक्याची मैना आशिया खंडातील बहुतेक देशात आढळणारा पक्षी आहे. ईशान्य भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि वायव्य बर्मा दक्षिण चीन, तैवान, बर्मा, थायलंड, लाओस, व्हिएतनाम आणि कंबोडिया आदि देशात हा पक्षी  आढळतो. भारत आणि इंडोचीनच्या मैदानी आणि टेकड्यांवर राहतात.  हिवाळ्यात हिमालयातील तळभागातून ते काठमांडू खोऱ्यात जातात., समुद्रसपाटीपासून 800 मीटरच्या वर असलेल्या डोंगराळ प्रदेशात हे  पक्षी आढळत नाहीत.  शहरी भागात या पक्ष्याचा वावर सामान्य असला त्री ते विरळ झाडे  व जंगली भागात असलेल्या मोकळ्या जागेत वावरतात. शेतात किंवा गावाबाहेर जिथे माणसाचा वावर कमी आहे अशा  ठिकाणी बिनधास्त वावरतात. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे हा पक्षी आढळला आहे.  

फोटो - डॉ. विधिन कांबळे (Photo - Dr. Vidhin Kamble) 

हे  पक्षी थव्याने वावरतात. हे पक्षी सर्वभक्षी, असून कीटक जसे वाळवी, सुरवंट. माश्या, फळे, परागकण आणि वनस्पतींचे फुले खातात.

प्रथम दर्शनी ब्रामणी मैनासारखा वाटणारा हा गाणारा पक्षी आहे.  लांबी  20  सेमी असते. शरीराचा वरचा भाग राखाडी असतो.   पंखांचा व शेपटीचा रंग काळा  असून डोक्यावर राखाडी रंगाची पिसे असतात. चोच लहान असून डोळ्याची बूबले पांढरी असतात. चोच फिक्कट निळी  व पिवळी असते.

विणीचा हंगाम सामान्यतः फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून जूनपर्यंत असतो. ३  ते १२  मीटर उंचीवर झाडाच्या पोकळीत घरटे बांधतात, सुतार पक्षी किंवा बार्बेट्सची जुनी घरटी वापरतात. मादी एकावेळी निळ्या- हिरव्या रंगाचे ठिपके असलेली  3-5 अंडी घालते,  नर -मादी दोघे मिळून घरटे बांधतात व आळीपाळीने १५ ते १७ दिवस अंडी उबवतात. नर-मादी दोघे ही पिलाना  भरवतात व पिलांची काळजी घेतात. पिल्ले 19-21 दिवसांत भरारी घेण्यास सज्ज होतात.

मलबार मैना किंवा करड्या डोक्याची मैना (Chestnut-tailed starling)

मलबार मैना  किंवा  करड्या डोक्याची  मैना शास्त्रीय नाव - Sturnia malabarica, इंग्रजी नाव - Chestnut-tailed starling महाराष्ट्रात अत्यं...