पक्ष्यांचे वय किती ?
पक्षी किती वर्ष जगतात हा नेहमीच भेडसावणारा प्रश्न आहे.
कारण पक्षी म्हातारे झाल्याचे क्वचितच पहावयास मिळतात. परंतु त्यांच्या वयाचा
अंदाज बांधता येत नाही. नैसर्गिक
परिस्थितीत कोणता पक्षी किती वर्षे जगतो हे सांगणे कठीण आहे. अनेकवेळा आजाराने किंवा विषबाधा झाल्याने पक्षी
मृत झालेले आपणास पहावयास मिळतात. लहान पक्षी नैसर्गिक परिस्थितीत पाच वर्षे
जगतात. मात्र बंदिवासात असणारे हेच पक्षी सहा ते सात वर्षे किंवा जास्त दिवस
जगताना आढळून आले आहे.
लहान पक्ष्यांपेक्षा मोठ्या पक्ष्यांना जास्त आयुष्य असते.
गरुड, कावळे, हंस, असे पक्षी २५ ते ३० वर्षापर्यंत जगतात. पण बंदिवासात याच पक्ष्यांची
आयुमर्यादा जास्त असते. पिंजऱ्यात ठेवलेला डोमकावळा ६५ ते
७० वर्ष, शहामृग ४० वर्षे,
ससाणा ३५ ते ४० वर्षे, घुबड ६८ वर्षे,
गरुड ५० वर्षे,
हंस २५ वर्षे,
कबुतर २५ वर्षे, मोर बंदिवासात २०
ते २५ वर्षापर्यंत जगतो तर नैसर्गिक
परिस्थितीत १५ ते २० वर्षे जगतो. बंदिवासात गरुड ५० ते ७० वर्षापर्यंत जगल्याच्या नोंदी आहेत. पोपट १५ ते
२० वर्षे, काही पोपटांच्या प्रजाती बंदिवासात
५०ते ८० वर्षे जगल्याची नोंद आहे. अंटार्क्टिकावर आढळणारा पेंग्विन पक्षाचे आयुर्मान
हे जास्तीत जास्त २६ वर्षे असते.
कावळा हा अमर आहे
हा गैरसमज आहे. साधारणतः कावळा १५
ते २० वर्षे जगतो मात्र बंदिवासात ८० वर्षे जगल्याची नोंद आहे. गिधाडे अनेक शतके जगतात हा दुसरा गैरसमज लोकांमध्ये
आहे. परंतु गिधाडाचे आयुर्मान ५२ वर्षे
आहे.
No comments:
Post a Comment