शिक्रा
घार (इंग्रजी: Shikra)
(शास्त्रीय नावः Accipiter badius)
ससाण्याच्या
कुळातील हा मांसाहारी शिकारी पक्षी असून आशिया व
आफ्रिका खंडात याचा वावर आढळतो.शिक्राच्या काही प्रजाती तुर्कस्तान, अफगाणिस्तान,
पूर्व इराण, श्रीलंका, निकोबार द्वीप समूह इत्यादी ठिकाणसह संपूर्ण महाराष्ट्रात आढळणारा हा पक्षी
आहे. विरळ झाडे-झुडपे तसेच मानवी वस्ती असलेल्या भूप्रदेशात आढळतो.ग्रामीण भागात
किंवा शेताच्या जवळ दाट झुडपांमध्ये त्यांचा आश्रय बघायला मिळतो.
बहुदा
जंगलामध्ये जोडीने राहातात. याचे मुख्य खाद्य लहान पक्षी, सरडे, पाली तसेच इतर पक्ष्यांची अंडी हे आहे.शिक्रा
पक्ष्याची नजर खूप भेदक असते. रंगाने ससाण्या सारखा असल्यामुळे बरेच जण याला ससाणा
समजतात.नर व मादी सारखे दिसायला असतात. शिक्रा हा कबुतराच्या आकाराचा घारीचा
प्रकार आहे. वरील बाजूने राखट निळसर तर खालील बाजूस पांढरा आणि त्यावर तपकिरी
पट्टे असतात. शिक्राच्या शेपटीवर रुंद
काळपट रेघा असतात. मादीचा आकार हा नरा पेक्षा मोठा असतो आणि तिच्या वरील बाजूस
तपकिरी रंग बघायला मिळतो. रंग वरून गडद तपकिरी आणि फिकट करडा असतो. पोटाकडून पिवळट
असून, त्यावर मधून-मधून काळे पट्टे असतात. नराप्रमाणेच शेपटी
आणि पंखाखाली काळ्या पट्ट्या असतात. शिक्रा हा शिकार करून आपला उदरनिर्वाह करीत
असतो. टोळ, नाकतोडे, बेडुक, उंदीर इत्यादी प्राणी हे त्याचे प्रमुख भक्ष्य आहेत. पक्ष्यांचा पाठलाग
करून त्यांची शिकार अत्यंत शिताफीने करतो. सातभाई, होला, पाकोळ्या, लाहुरी आदी
पक्ष्यांची ते शिकार करतात. शिक्रा आपल्या धारधार नख्यांनी ओरबाडून आणि टोकदार आणि
मजबूत चोचीने फाडून खातात. ग्रामीण भागात कोंबड्यांची पिल्ले उचलून नेऊन खाणे हे
त्यांचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते.
शिक्रा
पक्षी एका विशिष्ठ आवाजात ओरडतो. हे पक्षी ‘टिटुई ’ असा तीव्र
स्वर काढतात. शिक्रा पक्ष्याचा विणीच्या हंगाम उन्हाळा असून मार्च ते जून या काळात
अंडी घालून पावसाळ्यापूर्वी अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. विणीच्या हंगामात एकमेकांशी
प्रणय क्रीडा करताना हे पक्षी हवेत नाना प्रकारचे विक्षेप करतात व तसेच एकमेकांचा
पाठलाग करत पाण्यात सूर मारावा त्याप्रमाणे हे पक्षी हवेत सूर मारतात.बेडूक, सरडे, पावसामुळे बाहेर पडणारे सर्प असे विविध
प्रकारचे खाद्य सहज उपलब्ध होते. पिल्लांचे पोषण
चांगले व्हावे म्हणून पिल्लांचा जन्म पावसाळ्यापूर्वी व्हावा अशीच त्यांची
योजनाअसते. शहरी भागात व गावाजवळच्या मोठ-मोठ्या
झाडावर किंवा डोंगरांच्या कडेकपारीत नर-मादी दोघेही कावळ्या प्रमाणेच
घरटी बांधतात. काटक्या व धातूंच्या तारांचा वापर घरटे बनवण्यासाठी करतात. शिक्रा पक्षाची
मादीभर उन्हाळ्यात एका वेळेस ३ किंवा ४
फिकट निळसर पांढ-या रंगाची अंडी घालते. काही वेळा अंड्यांवर राखाडी रंगाचे फिकट
लहानमोठे ठिपके असतात. १८ ते २१ दिवसात अंडी उबवाल्यानतर पिल्ले बाहेर येतात.
No comments:
Post a Comment