निखार, छोटी निखार, छोटा गोमेट ( इंग्रजी नाव: SMALL MINIVET )
शास्त्रीय नाव : Pericrocotus flammeus
SMALL MINIVET (female) |
SMALL MINIVET (male) फोटो - डॉ. विधिन कांबळे (Photo - Dr. Vidhin Kamble) |
निखार हा लहान पक्षी उष्णकटिबंध प्रदेशामध्ये
म्हणजेच पूर्व भारतीय उपखंड ते इंडोनेशिया या प्रदेशामध्ये आढळतो. निखार
पक्ष्याच्या विविध देशात नऊ प्रजाती असून पाकिस्तान, ब्र्हमदेश, थायलंड, कंबोडिया,अंदमान, श्रीलंका,
विएतनाम इ. देशात आढळतात.
भारतात महाराष्ट्रासह पंजाब, राज्यस्थान,ओरिसा,कर्नाटका, केरळ, बिहार, उत्तरप्रदेश, इ.
राज्यात आढळतो.
नर निखर पक्ष्याचा रंग जळत्या निखाऱ्यासारखा सुंदर दिसतो.
आपल्या घराच्या आसपास असलेल्या झाडांवर छोट्या थव्याने हे पक्षी झाडावर आपल्याला
पहायला मिळतात. त्याचबरोबर जंगलात,झाडा-झुडपात ही हे पक्षी आढळतात. निखार हा आकाराने लहान असल्यामुळे आपल्या
दृष्टीस सहज पडत नाही. नर पक्षाचा वरच्या भागाचा रंग गडद काळा आणि पोटाकडील भाग
नारंगी पिवळा असतो. मादी पक्षाचा वरच्या भागाचा रंग राखाडी आणि पोटाकडील भाग फिकट
पिवळ्या रंगाचा असतो.
निखाराची चोच टोकदार, मजबूत व करड्या रंगाची पाय आणि बोटे काळी असतात. निखार
पक्षाची लांबी साधारण १५ ते २० सें. मी . पर्यंत असते हे पक्षी झाडावरील किडे
खातात. व दिसायला खूप आकर्षक असतात. हे
पक्षी ‘स्वी-स्वी’ असा आवाज करतात.
निखार पक्ष्याचे किडे-मकोडे व कीटक
हे मुख्य अन्न असल्यामुळे शेतकऱ्यासाठी नैसर्गिक कीड नियंत्रणाचे महत्वाचे काम
करतो. त्याचबरोबर लहान फळे खायला त्याला आवडतात.
विणीचा हंगाम एप्रिल ते सप्टेंबर हा असून, अंडी घालण्यासाठी मादी घरटे तयार करते. क्वचितच
नर घरटे बनवण्यामध्ये मदत करतो. गवत कड्या
व झाडांच्या मुळ्यापासून घरटे छोट्या झुडपात बनवलेले असते. घरटे साधारण कपाच्या
आकारासारखे असते यामध्ये साधारण दोन ते चार अंडी बसतील एवढी जागा असते.अंडे हे
बदामी रंगाचे असते. अंड्यावर फिक्कट किंवा गडद चोकलेटी ठिपके असतात. मादी एकटीच अंडी उबवण्याचे
काम करते. नर-मादी पिलांना भरवण्याचे काम करतात.अंड्याचा उबवण कालावधी १२ ते १३
दिवसाचा असतो. अंड्यातून पिल्ले बाहेर पडल्यावर १८ ते २० दिवसात पिले उडण्यास
सक्षम होतात. उर-मादी पिलांना भक्ष्य पकडण्यास शिकवतात.
No comments:
Post a Comment