Saturday, September 28, 2019

भारतीय नीलपंख, तास, टटास,चास ( INDIAN ROLLER, Blue jay)

भारतीय नीलपंख, तास, टटास,चास ( INDIAN ROLLER, Blue jay)
शास्त्रीय नाव : Coracias benghalensis



भारतीय नीलपंख हा रोलर कुळातला पक्षी आहे. याला चास किंवा नीलकंठ असेही म्हणतात. भारतीय नीलपंख भारतात सर्वत्र आढळून येतो. तसेच दक्षिण आशियाई देशात त्याचे वास्तव्य आढळते. इराक, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड  या देशात त्याचे वास्तव्य आहे. भारतीय नीलपंख हा रोलर कुळातील पक्षी असून याला चास किंवा नीलकंठ असेही म्हणतात. नीलकंठ हा एकटा-दुकटा दिसणारा पक्षी आहे. भारतीय नीलपंख हा स्थानिक पक्षी असून खुल्या मैदानी भागात, पानगळीच्या जंगलात, शेताच्या जवळ, रस्त्याच्या कडेने असलेल्या विद्युत तारांवर दिसतो.
निळकंठ पक्ष्याबाबत भारतात अनेक श्रद्धा व अंधश्रद्धा आहेत. काही लोक निळकंठ पक्ष्याचे दर्शन शुभ मानतात तर काही ठिकाणी अशुभ. प.बंगालमध्ये ग्रामीण भागात विजयादशमीच्या दिवशी दर्शन होणे शुभ मानले जाते. गड आला पण सिंह गेलाहा तानाजी मालुसरेंचा पोवाडा आपण ऐकला असेल. त्यामध्ये तानाजी कोंढाणा किल्ला सर करण्यासाठी जात असताना त्यांना वाटेत्त तास पक्षी अडवा गेला होता. आणि हा अपशकून समजला गेला होता. कोंढाणा किल्ला जिंकला पण तानाजी गेला होता. रामायणात जेव्हा राम हा रावणाचा वध करण्यासाटी निघालेला असताना रामाला तास पक्ष्याचे दर्शन घडलेले असते असा उल्लेख आढळून येतो. 
महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारा नीलकंठ हा पक्षी मध्यम आकाराचा असतो. निळकंठ हा रंगाने सुंदर असून स्थिर बसल्यावर त्याचा पिसारा निळसर दिसतो. हवेत उडताना त्याच्या पंखाच्या विविध छटा आपणास पहावयास मिळतात. नीलकंठ पक्षाचा छाती आणि गळाही अगदी निळा असल्यामुळे त्याला शंकर म्हणूनही ओळखले जाते.  त्यामुळे त्याला पवित्र मानले आहे. पंख व शेपूट गडद निळी दिसतात. पाठीचा रंग तपकिरी, चोच मादी फिकट काळ्या रंगाची असते. काळ्या रंगाची असते निळकंठ पक्ष्याचे मुख्य खाद्य कीटक असून तो खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा फडश्या पडत असतो. त्यामुळे तो शेतकऱ्यांचा मित्रही आहे. त्याचबरोबर बेडूक, पाली, उंदीर, सरडेसुद्धा खातो.  चॅक चॅक चॅकअसा आवाज करतो, किंवा जोरात घुमणारा हूप हूप असा आवाज करतो.त्याच्या या आवाजाने आपले अस्तित्व आपल्या जातभाईंना प्रदर्शित करत असतो.
मार्च ते जुलै महिना हा काळ वीण हंगाम असतो. नीलकंठ आपले घरटे झाडांच्या ढोलीत करतो. घरटे हे गवत, काड्या वापरून झाडाच्या ढोलीत किंवा भिंतीतील छिद्रात बनवलेले असते. मादी एकावेळी ४ ते ५ चमकदार पांढऱ्या रंगाची अंडी देते. नर आणि मादी दोघेही अंडी उबवण्याचे काम करतात. पिल्ले उडण्या योग्य होई पर्यंत त्यांचा सांभाळ करतात. 

(नीलकंठ हा पक्षी ओरिसा, आंध्रप्रदेश,  बिहार, कर्नाटक आणि  तेलंगना राज्यांचा राज्य पक्षी आहे.)

No comments:

पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे Mandesh for Bird Watchers and Travelers

                      पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे माण नदी खोऱ्यात येणाऱ्या भौगोलिक प्रदेशाला ‘ माणदे...