१. हळद्या (इंग्रजी नाव : INDIAN GOLDEN ORIOLE)
शास्त्रीय
नाव Oriolus
oriolus
मराठीत हळद्या, पिलक अशी
नावे असलेला हा पक्षी संपूर्ण भारत देशभर आढळतो. आम्रपक्षी, हळदुल्या,
हळदोई अशाही नावाने तो ओळखला जातो. नर हळद्या मुख्यत्वे जर्द
पिवळ्या रंगाचा असून याच्या पंखांचा व शेपटाचा रंग काळा असतो. तसेच याच्या
डोळ्याजवळ काळ्या रंगाची पट्टी असते. मादी नरासारखीच पण किंचीत फिक्या हिरवट
पिवळ्या रंगाची असते. झाडांवर एकट्याने किंवा जोडीने आढळतो. फुलांमधील मध, विविध फळे आणि लहान किडे हे याचे मुख्य अन्न आहे. त्याच्या रंगामुळे झाडावर हळद्या नजरेस पडणे जरा कठीणच, आवाजावरूनच तो ओळखू येतो. गर्द झाडीत पानाआड बसून ब-याचदा
पिलोS SपिलोS S ...असा आवाज कानावर
पडतो,
हळद्याचे
घरटे लहान, कपाच्या आकाराचे असते. गवत, कोळ्याच्या जाळ्याने
व्यवस्थीत बनवलेले– असते. विणीचा हंगाम एप्रील ते जुलै असा असून मादी एकावेळी २ ते
३ पांढर्या रंगाची अंडी देते. पिलांचे संगोपनाची सगळी कामे नर मादी दोघे मिळून
करतात
No comments:
Post a Comment