Saturday, July 13, 2019

चीरक / दयाळ / (indian Robin ) Saxicoloides fulicata


चीरक / दयाळ -  (Indian Robin ) शास्त्रीय नाव. Saxicoloides fulicata

Saxicoloides fulicata
चीरक किंवा इंडियन रॉबिन आशिया खंडात आढळणारा पक्षी असून भारत, पाकिस्तान, नेपाल, श्रीलंका,भूतान, बांग्लादेश इत्यादी देशात आढळतो. मराठी भाषेत नावे चीरकाला काळोखी, खोबड्या चोर, कोळशी, लहान सुई अशी नावेही त्याला प्राप्त झाली आहेत.  चिमणीपेक्षा मोठा असणारा नर सर्वांगाने काळा कुळकुळीत असतो.   तर मादी तपकिरी रंगाची असते. घराभोवती, बागेत, शेतांजवळ, तसंच मोकळ्या माळावर, तारांवर, खांबांवर, आमराया आणि पानझडीच्या जंगलातही दयाळ दिसतो . घरांच्या अंगणात सहजपणे वावरणारा चीरक हा पक्षी खिडक्यांच्या गजावर बसतो.कीटक खाणारा हा पक्षी कधी-कधी फुलामधला मधहि चाखतो. वाळवी खाणे त्याला पसंत असते.  आपल्या घराच्या आसपास नेहमी क्मपौंडवर बसून शेपटी वर-खाली करत तुरुतुरु चालून क्षणभर थांबणार. यावेळी शेपूट मागे उंच उचलून धरणार तेव्हा शेपटीच्या बुडाशी असलेला तांबडसर भाग दिसतो. एरव्ही तो दडलेला असतो. उडत असतांना तो स्पष्टपणे जाणवतो. मादी नरासारखीच पण फिकट रंगाची तिच्या पंखात ठिपका नसतोच. एकमेकांचा पाठलाग करतांना नर चिरssचिरss असा आवाज करतात.  त्याच्या त्या आवाजामुळेच त्याला चीरक असं म्हणतात. विणीच्या हंगामात तो झाडाच्या शेंडयावर बसून एखाद्या गवईबुवा सारखा  छान गातो.  सुंदर शिळ घालत तो गातो. म्हणून त्याला दयाळ हे नाव दिलेले आहे.
एप्रिल-मे  हा   विणीचा  हंगाम असतो.. या काळात नराच्या पंखात पांढरी रेषा उमटते. नर-मादी दोघेही घरटे बांधण्याचे काम करतात. घरटे एखाद्या झुडपात किंवा झाडाच्या बुडात पडलेल्या नारळाच्या करवंटीमध्ये घरटे बनवतात. भिंतीना असणाऱ्या छिद्रामध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये अथवा मडक्यामध्येही आपले घरटे बनतात. घरटे वाटीसारखे असते. बहुतेक वेळा घरट्यात सापाची कात लावलेली आढळते. सापाची कात म्हणजे साप असल्याची खुण त्यामुळे कदाचित् त्याच्या घरट्याभोवती संरक्षण कवच तयार होत असेल. व त्यामुळे शत्रूपासून घरट्याचं संरक्षण होत असेल. चीरकाची मादी ३ ते ४ पांढऱ्या रंगाची अंडी घालते. अंड्यावर लाल, निळसर किंवा तपकिरी ठिपके असतात. १० ते १२ दिवस अंडी उबवाल्यंतर पिले बाहेर येतात. पिलांना भ्र्वन्याठी किडे खाऊ घालतोच पण पाल बेडूकसुद्धा खाऊ घालून पिलांची जोपासना करतो.



Dr. Vidhin Kamble
Department of Zoology Sangola 

No comments:

पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे Mandesh for Bird Watchers and Travelers

                      पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे माण नदी खोऱ्यात येणाऱ्या भौगोलिक प्रदेशाला ‘ माणदे...