खंड्या
/धीवर – (White Breasted Kingfisher)
शास्त्रीय नाव : Halcyon smyrnensis
खंड्या /धीवर – (White Breasted Kingfisher)
खंड्या हा पाणथळी जागेजवळ रहाणारा पक्षी आहे.खंड्या हे सामान्य नाम असून या पक्षाच्या
विविध जातींपैकी पांढर्या छातीच्या खंड्याला नुसते खंड्या या नावाने ओळखतात.काही लोक
याला बंड्या, बंडू तर काही लोक
धीवर नावाने ओळखतात. महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. राजू कसंबे
यांनी या पक्ष्याला धीवर हे नाव दिले आहे. धीवर म्हणजे मासे पकडणारा.कोळी
लोकांनाही धीवर म्हणतात.
जगभरात खंड्याच्या
८६ प्रजाती आढळतात. भारतात खंडया पक्षाच्या सुमारे वीस
जाती आहेत.याच्या इतर जातभाईंची नावे लहान खंड्या, कवडा खंड्या, काळ्या डोक्याचा खंड्या, तिबोटी खंड्या, घोंगी खंड्या, मलबारी खंड्या अशी आहेत. बंड्या (Pied Kingfisher) हा राखाडी पांढऱ्या रंगाचा आकाराने लहान असलेला कवड्या
खंड्या किंवा कवड्या धीवर आहे.काळ्या डोक्याचा खंड्या (Black-capped Kingfisher).
हा पक्षी अंदमान आणि निकोबारसह भारताच्या समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशात सर्वत्र आढळतो. तसेच बांगलादेश, श्रीलंका, थायलंड, फिलिपिन्स, बल्गेरिया, तुर्की आदी देशांतही याचे वास्तव्य आहे. अंगावरील
विविध आकर्षक रंग हे खंड्याचे प्रमुख वैशिष्ट आहे.
चोच लाल रंगाची असते. पाठीचा रंग निळा असतो. पोटाकडून छातीचा भाग पांढरा, तर खालील भाग लालसर पिवळा असतो. यांच्या
डोक्यावर काळी टोपीचा आकार असतो. या प्रकारच्या खंड्यामध्ये नर आणि मादी दिसायला
सारखेच असतात.
पाय आणि लांब चोच गडद लाल रंगाची
असते मैनेपेक्षा थोडासा लहान असलेल्या या पक्षाची चोच मात्र खंजिरासारखी दणकट. तर
डोके,
कान व ओटीपोटा कडील भाग तपकिरी रंगाचा असतो.'नर
मादी’ दिसायला सारखेच दिसतात. फरक एवढाच की नराच्या गळयाखाली दोन अखंड पट्टे असतात
तर मादीमध्ये हा पट्टा तुटलेला असतो. जलाशयातील पाण्यामध्ये वेगाने सूरमारण्याची
खंड्याची पद्धत कोणालाही आकर्षित करते.
बऱ्याचदा हा पक्षी मानवीवस्तीजवळ
घरांच्या आसपास असलेल्या झाडांवर तसेच विजेच्या तारांवर बसलेला दिसतो. हा पक्षी मैदानी मुलुखात,
झाडीच्या भागात अथवा लहान झुडूपामध्ये आढळतो.जलाशयावर मासे पकडून तर
खातोच पण ओलसर जमिनीवर किडे आणि अळ्यावर
सुद्धा ते ताव मारतात. बेडकाची पिल्ल, टोळ, सरडे, कीटक हे सुद्धा खांद्याचे भक्ष्य म्हणून बळी
पडतात. खंड्या हेलीकॉप्टरसारखा हवेत एका जागेवर स्थिर होऊन फडफडत असतो. काही वेळ असंच स्थिर राहून पाण्याच्या दिशेनं एखाद्या
बाणासारखे अगं झोकून देतो व जलाशयातील माश्याचा अचूक वेध घेत त्याची शिकार करतो.
परंतु नेहमीच यश मिळेते असे होत नाही. अनेकवेळा त्याला मासे पकडण्यासाठी प्रयत्न
करावे लागतात.
खंड्याचा विणीचा हंगाम मार्च
ते जुलै असतो. विणीच्या हंगामात खंड्याचे दर्शन आणि त्यांच्या रंगांमध्ये होणारे
बदल हे पावसाच्या आगमनाचेही संकेत देत असतो. खंड्या पक्षी आपले घरटे म्हणजे
जलाशयाच्या काठावर बिळ बनवलेले असते. हे बीळ ३ ते ८ फूट इतकी लांब असू शकतात.लांब
असते. शेवटी मोठी पोकळ जागा तयार केली जाते. ज्यामध्ये मादी अंडी घालते. मादी एका खेपेस ३ ते ६ अंडी घालते. काही खंड्या मादी १० अंडी घालतात. नर-मादी दोघेही अंडी उबवण्याचे
काम करतात त्याचबरोबर पिलांचे पालन-पोषणही करीत असतात. साधारणतः १९ ते २० दिवसांनी
अंड्यातून पिल्लू बाहेर येते. ही पिल्ले २४ ते २५ दिवस बिळात राहतात. पिल्ले इतकी
खादाड असतात की दिवसभरात १०० मासे फस्त करतात आणि त्यांचे आई-वडील त्यांचे चोचले
पुरवतात. पिल्ले आपल्या पालकाबरोबर ३ ते ४
महिने राहातात.
(खंड्या हा पश्चिम बंगालचा राज्य
पक्षी आहे.)
कवडा खंड्या (Pied Kingfisher )
बंड्या (Alcedines )
फोटा आणि लेखक
Dr. Vidhin Kamble
Department of Zoology
Sangola College, Sangola
Dist. Solapur
No comments:
Post a Comment