बुलबुल
/ लालबुड्या (Redvented bulbul)
शास्त्रीय नाव : Pyenonotus cafer)
बुलबुल / लालबुड्या (Redvented bulbul)
लाल बुडाचा
बुलबुल संपूर्ण भारतासह बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार येथील
उष्णकटिबंधीय वनात, झुडपी जंगलात, शेतीच्या
प्रदेशात, बागेत, जोडीने अथवा थव्याने
राहणारा पक्षी आहे. महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारा
बुलबुल हा पक्षी मध्यम आकाराचा चिमणीपेक्षा मोठा आणि साळुंकीपेक्षा छोटा
असतो., हे पक्षी थव्याने राहतात. तोंडावळा काळा असतो. शेपटीच्या सुरुवातीला खालच्या बाजूला एक
लाल ठिपका असतो. त्याच्या विरूद्ध बाजूला पांढरा टीळा असतो. डोक्यावर कुंची चढवलेली असते. सतत गोंगाट
करणारे, मुख्यत्वे फिक्या रंगांचेआणि हलक्या पिसांचे पक्षी
आहेत. पोट पांढरे असून अंग काळसर तपकिरी असते. यांची चोच लहान ते मध्यम आकाराची आणि थोडी
बाकदार असते. यांचे पाय लहान आणि अशक्त असतात. बुलबुल हा खूप बडबड्या पक्षी आहे.
बुलबुल हा पक्षी मिश्राहारी
असून किडे, वड-पिंपळ इत्यादी झाडांची फळे, फुलातील मध, यावर उपजीविका करतात. तसेच
खरकटे खाताना सुद्धा बुलबुल दिसून येतो.
बुलबुल पक्षाचा विणीचा हंगाम
जुने ते सप्टेंबर असतो. मादी एकावेळी २-३ फिक्कट गुलाबी अंडी घालते. अंड्यावर गडद
लाल रंगाचे ठिपके असतात. नर-मादी पिलांचे
संगोपन करण्यापासून सर्व कामे मिळून करतात.
Dr. Vidhin Kamble
Department of Zoology
Sangola College, Sangola
Dist. Solapur
No comments:
Post a Comment