Thursday, July 25, 2019

खाटिक / गांधारी (Rufousbacked shrike) शास्त्रीय नाव : Linius schach


          खाटिक / गांधारी  (Rufousbacked shrike)
             शास्त्रीय नाव : Linius schach


                           खाटिक / गांधारी  (Rufousbacked shrike)

या पक्षाला खाटिक हे नाव देण्याचे कारणही फार मजेशीर आहे. खाटिक हा पूर्ण मांसाहारी पक्षी आहे. ज्याप्रमाणे खाटिक कापलेले जनावर टांगतो तसाच हा पक्षीसुद्धा मांसाचे छोटे-छोटे तुकडे अथवा मोठ-मोठे किडे काटेरी झाडाच्या काट्यामध्ये खोचून ठेवतो व भूक लागेल तसे थोडे-थोडे खात असतो.
युरेसिया, आफ्रिका उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका,ऑस्ट्रेलिया या देशाबरोबरच आशिया खंडात आढळणारा पक्षी आहे. भारतात सर्वत्र आढळणारा हा पक्षी महाराष्ट्रात सर्वत्र त्याचा आढळ आहे. खाटिक हा कोरड्या प्रदेशात, झुडपी प्रदेश, शेतात वावरणारा पक्षी आहे. खाटिक हा पक्षी बुलबुलपेक्षा थोडा मोठा असतो. याची पाठ बदामी रंगाची असते. डोक्याभोवती मागेपुढे एक काळा ठिक्कर पट्टा असतो. हा पट्टा महाभारतातील गांधारीप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखा दिसतो म्हणून याला गांधारीसुद्धा म्हणतात.शेपटी काळी असून त्यामध्ये थोड्या बदामी रेषा असतात. पंखातही असेच रंगाचे मिश्रण असते. पोटाचा रंग पांढरा असतो.  खाटीक वेगवेगळे आवाज काढतो. उन्हाळ्यात दुपारच्या वेळी याचे गाणे बरेच लांब गाणे चालते. त्याचबरोबर इतर पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल तो हुबेहूबकरीत असतो.खाटिक तुडतुडे,  टोळ, नाकतोडे, बेडूक,, लहान पक्षी, रानउंदरांची पिल्ले, सरडे आणि पाली, ,लहान साप खातो. वर सांगितल्याप्रमाणे काट्यामध्ये टोचून ठेवतो व वेळ मिळेल तेव्हा चवीने खातो.
खाटिक मोठा अप्पलपोट्या पक्षी आहे. भूक नसली तरी जेव्हा शिकार मिळेल तेव्हा शिकार करून ती काटेरी झाडावर कात्यामध्ये खोचून ठेवतो. एखादी शिकार तो ८ ते १०  दिवस साठवतो आणि पुरवून खातो. शिवाय अशी शिकार खोचून ठेवण्यामुळे तो त्याचे जणू साम्राज्य जाहीर करत असतो. मादी खाटिक पक्ष्याला आकर्षित करण्याचे हे एक त्याचे तंत्र असते. त्याच्या खोचून ठेवण्याच्या सवयीमुळे याचे नाव खाटिक असे पडले.खाटिक पक्ष्याच्या अनेक जाती आहेत. आजपर्यंत एकूण ३० जाती नोंदवल्या आहेत. या सगळ्यांमध्ये एक प्रमुख  साम्य म्हणजे लांब काळी शेपटी. त्यापैकी कवड्या माशिमार खाटिक, मोठा रानखाटीक,रानखाटीक, तपिकरी खाटिक, उदी पाठीचा खाटिक,तांबूस पाठीचा खाटिक,राखी खाटिक,करड्या पाठीचा खाटिक असे प्रकार आढळून येतात.
मे ते जुलै हा विणीचा हंगाम असतो. खाटिक पक्ष्याची नर-मादी जोडी कायम एकत्र असते. विणीच्या हंगामात नर खाटिक गाणे गातो. तसेच मादीला अन्न भरवत असतो. खाटिक काटेरी झाडांच्या फांद्यामध्ये जमिनीपासून ३-४ मीटर उंच आपले घरटे बनवतो. शक्यतो मादी घरटे ब्नावाण्यामध्ये पुढाकार घेत असते. ६ ते ११ आठवड्यात घरटे बांधून पूर्ण होते. घरटे बांधण्यासाठी फुले, पंख, केस, शेवाळ, दगडफूल, किंवा चिंध्याचाही वापर केलेला आढळून येतो. खोलगट आकाराचे घरटे बनवतो. घरटे गवत काड्या व बारीक  काटक्यांनी बनवलेले असते. मादी एकावेळी ४ ते ६, फिकट हिरव्या रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली अंडी देते.अंडी १५ ते १७ दिवस उबवल्यांनतर पिले बाहेर येतात. अंडी उबवण्याचे काम मादी करत असते तर नर तिला खाद्य पुरवण्याचे काम करीत असतो. पिल्ले २ ते ३ आठवड्यात घरट्यातून उडून जाण्यास सिद्ध होतोत. मात्र ३ ते ५ आठवड्यानंतर स्वतन्त्रपणे जगू शकतात.



Dr. Vidhin Samble 
Sangola College Sangola 

No comments:

पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे Mandesh for Bird Watchers and Travelers

                      पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे माण नदी खोऱ्यात येणाऱ्या भौगोलिक प्रदेशाला ‘ माणदे...