भारद्वाज
(Crow
Pheasant/Coecal )
Article and Photo
Dr. Vidhin Kamble
Email. vidhinkamble16@gmail.com
शास्त्रीय नाव : Centropus
Sinesis
भारतामध्ये
भारद्वाज पक्षीचे दर्शन हे फार शुभ मानतात. ह्या पक्ष्याला इंग्रजी Greater Coucal or Crow Pheasant असं
म्हणतात. भारद्वाज अनेक नावांनी ओळखला जातो. सोनकावळा कुकुटकुंभा, कुंभारकावळा, देवकावळा ऋषीच्या नावाने ही ओळखला
जातो. तसेच लाल कावळा, सुलक्षणी, कुंभारकुकडी,
कुक्क्कुटकुंबा, कुक्कुडकोंबा ही सुद्धा
भारद्वाजाची वेगवेगळी नावे आहेत. भारतभर सर्वत्र
आढळणारा हा पक्षी अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहे.भारद्वाज हे काही लोकांचे
गोत्रआहे. भारतासह आशिया खंडात सर्वत्र आढळणारा हा पक्षी कावळ्यापेक्षा
आकाराने काहीसा मोठा असतो. हा पक्षी अगदी कुठेही आढळतो. मानवी वस्तीच्या जवळ,
मैदानी, गवताळ प्रदेशात, झाडाझुडूपात देखील आढळतो. पंखांचा
रंग तांबट असतो तर बाकी शरीर, चोच आणि पाय काळ्या रंगाचे
असतात. रद्वाजची शेपटी लांब आणि काळी असते जी टोकाकडे निमुळती होत जाते आणि
डोळ्यामध्ये किरमिजी रंग दिसतो. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात फक्त मादी
आकाराने किंचित मोठी असते. मोरासारखा डौलदार भरारी घेणारा. ही भरारी घेत असताना
याचे तपकिरी सोनेरी पंख अतिशय सुंदर दिसतात. भारद्वाज हा पक्षी कोकीळ कुळातील आहे.
भारद्वाज
पक्ष्याची उडण्याची क्षमता कमी असते. तो झाडावर चढताना उड्या मारत खालून वर चढत
जातो. तो झाडाखाली पानात भक्ष्य शोधीतो., मोठे किडे, उंदराची पिल्ले, सरडे, लहान साप आणि इतर पक्ष्यांची अंडी व पिल्ले हे
यांचे भक्ष्य असते. भारद्वाज कूक-कूक-हूप-हूप. असा घुमणारा आवाज करतो. भारद्वाज
जरी ककु कुटुंबातील सदस्य असला तरी हा इतरांच्या घरट्यात आपले अंडे टाकून निघून
जाणारा पक्षी नाही. भारद्वाजांचा
प्रजोत्पादनाचा काळ फेब्रवारीपासून सप्टेंबरपर्यंत असतो. घरटे घुमटाच्या अथवा घड्याच्या
आकाराचे व बरेच मोठे असून ते काटक्या, पाने, गवत यांचे बनविलेले असते. काटेरी झुडपांच्या जाळीच्या मध्यभागी बेताच्या
उंचीवर अथवा झाडाच्या फांदीच्या दुबेळक्यात किंवा बांधावर ते बांधलेले असते. घरटे
तीन ते आठ दिवसांमध्ये बांधून होते. जमिनीपासून साधारण सहा मीटर उंचीवर घरटे
बांधले जाते. त्यांचे दार एका बाजूला असते. एका वेळी ३ ते ५ अंडी घालतात. अंडी
पांढरट असून पिवळ्या रंगाची त्यावर चमक असते.१५ ते १६ दिवसात अंडयातून पिले बाहेर
येतात आणि १८ ते २२ दिवसात घरट्यातून बाहेर पडून स्वतंत्रपणे जगतात. जंगली कावळे
भारद्वाजच्या पिलांना मोठ्या प्रमाणावर मारून खात असल्याचे अनेक वेळा पहिले आहे.
नर व मादी दोघेही सर्व प्रापंचिक कामांत भाग घेतात.
(मे २०१६ मध्ये सावंतवाडी
शहराचा नागरी पक्षी म्हणून भारद्वाज पक्ष्यास
मतदान घेऊन मान्यता देण्यात आली.)
Dr. Vidhin Kamble
Department of Zoology
Sangola College, Sangola
No comments:
Post a Comment