शास्त्रीय नाव: Cuculus varius varius
भारतात ब्रिटिश राजवटीत राहणाऱ्या
इंग्रजांनी या पक्ष्याला ‘ब्रेनफीव्हर बर्ड’
हे नाव दिले आणि ते रूढ झाले. उत्तर भारतात याला ‘पपीहा’ म्हणतात. हा पक्षी भारत आणि श्रीलंकेमध्ये
आढळतो. तर महाराष्ट्रात त्याला पावश्या म्हणतात. कारण त्याचे आणि शेतकऱ्यांचे
जवळचे नाते आहे.
पावसाळा
येण्याच्या तोंडावर एक मंजुळ आवाज सारे शिवार दणाणून सोडतो. तो पावश्या या पक्षाचा
आवाज असतो. पावश्या हा कबूतराच्या आकाराचा पक्षी भारतात
बहुदा सर्वत्र आढळतो. मनुष्य वस्तीच्या आसपास पण उन्हाळयात ओरडून त्याचे अस्तित्व दाखवितो
आहे. या पावश्याचा आवाज चार ते सहा वेळा खालून वरच्या पट्टीत वाढत जातो व एक दोन
मिनिटे थांबून परत सुरू होतो. ढगाळ वातावरणात आणि चांदणे पडलेल्या रात्रीत
पावश्याच्या ओरडण्याचा आवाज अनेक वेळा तुम्ही ऐकला असेल.
हा -कबुतराएवढा पण त्याच्यापेक्षा सडपातळ आणि
जास्त लांब शेपटी असणारा पक्षी आहे. शरीराची वरची बाजू राखी करड्या रंगाची आणि
खालची बाजू पांढरट असून तिच्यावर आडवे तपकिरी पट्टे; शेपटी
करड्या रंगाची असून तिच्यावर रुंद तांबूस पट्टे डोळे आणि पाय पिवळ्या रंगाचे;
चोच हिरवट रंगाची; असते.. नर आणि मादी यांच्या
रूपात फार फरक नसतो.लांबून पाहिला तर ससाण्यासारखा
दिसतो. पावश्याचे ओरडणे हे त्याच्या प्रेयशीसाठी असते. तो तिला आपल्या आवाजाने
आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असतो. पावश्याचा विणीचा हंगाम मार्च ते जून
या कालावधीत असतो.
पावशाचे नाते पावसाळ्याशी जोडले आहे. मान्सूनचा पाऊस येण्याआधी
याच्या 'पाऊस आला', 'पाऊस आला' किंवा शेतकऱ्यांना किंवा 'पेरते व्हा', 'पेरते व्हा' अशा प्रकारचा संदेश आपल्या आवाजातून देत
असतो. पावश्याचे आगमन म्हणजे पावसाचे आगमन नक्की होणार या भावनेने शेतकरी शेतीच्या कामाला लागतात. झाडाच्या पानाआड
राहुन आपला संदेश पोहचवण्याचे काम करणारा. प्रत्येकाला आपल्या गरजेप्रमाणे संदेश
देणारा. शेतक-यांना ‘ पेरते व्हा! ‘ असे
म्हणत काम करा सांगणारा ! ‘ पी कहाँ ‘ म्हणत
प्रेमिकांच्या भावनांना साद घालणारा असे किती तरी रुप आपल्याला महिती आहेत.
नर-मादी दिसायला एकसारखेच असतात. त्यामुळे नेमके नर ओरडतो की मादी हे सांगता येत
नाही. परंतु काही पक्षी अभ्यासंकांच्या मते मादी थोड्या चिरक्या आवाजात ओरडते.
पावशा अळया, किडे, खातो. तसेच अंजीर, बोरासारखी
छोटी फळेही तो आवडीने खातो.
कोकीळेसारखेच पावश्या घरटे
बांधण्यासाठीतसदी घेत नाही. आपल्याच कुळातील सातभाईच्या घरट्यात आपली अंडी घालतो व
विनासायास ती उबवून घेण्याचं काम करून घेतात. आपल्याला माहित
आहेच की कोकिळ घरटं बांधण्याचे कष्ट घेत नाहीत. कोकीळ कावळ्याच्या घरट्यात अंडी
घालून पसार होते. बहुधा एका घरट्यात ती एकच अंडे घालते. अंडे सातभाईच्या
अंड्यासारखेच निळे असते. पावशाचे पिल्लू अंड्यातून बाहेर बाहेर पडले म्हणजे ते सातभाईंची
अंडी आपल्या पाठीने घरट्यातून खाली ढकलून देते. एवढ्यावरच ते थांबत नाही. सातभाईची
पिल्ले अंड्यातून बाहेर पडली की पिल्लांनासुद्धा ते घरट्याबाहेर ढकलून देते. इतके
ते अहेसान फरामोश असते. रंगरुपाने सातभाईच्या पिलांसारखी पावश्याची पिले दिसतात.
ती खूप खादाडही असतात. बिचारे सातभाई आपलेच पिल्लू समजून त्या उपऱ्याला भरवत
असतात. सातभाई नर-मादी या पिल्लाचे लालन-पालन करतात.
Article and Photo
Dr. Vidhin Kamble
Email. vidhinkamble16@gmail.com
Article and Photo
Dr. Vidhin Kamble
Department of Zoology
Sangola College, Sangola
1 comment:
��������
Post a Comment