१. ब्राम्हणी
मैना. (Brahminy मैना किंवा Black headed
मैना)
शास्त्रीय नाव: Sturnus pogodarum
ब्राम्हणी
मैनेला पोपई मैना, भांगपाडी मैना, म्हणूनही संबोधले जाते. आशियाई
देशात आढळणारा हा पक्षी असून भारत, पाकिस्तान, अफगाणिस्थान, नेपाळ, श्रीलंका आदि
देशात हा पक्षी प्रामुख्याने आढळतो.
ब्र्हामनी मैना हा पक्षी आकाराने साळुंकी या पक्ष्यापेक्ष्या थोडा छोटा
असतो. डोक्यावर शेंडीसारखा मागे वळलेला पिसांचा तुरा असतो. नर-मादी दिसायला
एकसारखे असतात. अंगावरची पिसे तांबूस खाकी रंगाची असतात. चोचीच्या शेवटी निळसर रंग
असतो. साळुंकी सारखे विविध आवाज करण्यात हा पक्षी पटाईत असतो. निवांतक्षणी झाडावर
बसून मंजुळ व सुरेल आवाज करत बडबड करीत असतो. आवाजामध्ये विविध पक्ष्यांच्या
आवाजाची नक्कल करतो.
ब्राम्हणी
मैना हा पक्षी पानगळी जंगले, शेतीप्रदेश व मनुष्यवस्तीच्या आसपास वावरणारा पक्षी
असून मिश्राहारी आहे. नेहमी किडे खून गुजराण करणारा हा पक्षी वड, पिंपळ, बोर, चेरी
आदी झाडांची फळांवर तव मारताना दिसतो. पोपई मैनाची घरटी मानवीवस्तीचा आसपास केलेली
आढळतात. भिंतीना असणाऱ्या छिद्रात, घरांच्या वळचणी किंवा छप्पर इत्यादी ठिकाणी
सुद्धा केलेली आढळतात. अलीकडे गवत काड्यांची छपरांची जागा सिमेंटचे पत्रे व
स्ल्याबनी घेतल्यामुळे पर्याय म्हणून छतावरचे पाणी वाहून जाण्यासाठी लावलेल्या
नळीमध्ये अनेकवेळा आपली घरटी करतात. त्याचबरोबर कृत्रिम घरट्यांचाही वापर चांगल्या
पद्धतीने करत असल्याचे दिसून येते. कृत्रिम घरटी हा आता एक चांगला पर्याय आहे.
काही पक्षिमित्र आपल्या घरांना छोटी मडकी किंवा लाकडी घरटी टांगून मैनेसाठी जागा
करून देत आहेत. त्यामुळे या मैनाची संख्या
वाढताना दिसून येत आहे.
पोपई
मैनेचा विणीचा हंगाम मार्च ते सप्टेंबर आहे. चिमण्यांचासुद्धा विणीचा हंगाम याच
काळात असल्याने घरटी बांधताना चिमणी आणि ब्राम्हणी मैना यांच्यात घरट्यांसाठी जागा
मिळवताना बरीच स्पर्धा चालू असते हे मी अनुभवले आहे. . या काळात नर मादी झाडावर
बसून गाणी म्हणत असतात. नर-मादी दोघेही घरटे बनवण्याच्या कामात व्यस्त असतात.
गवताच्या काड्या, झाडांची पाने, पिसे व कापूस इत्यादी गोष्टींचा वापर घरटे
बनवण्यासाठी केला जातो. मादी फिक्कट निळसर रंगाची ३ ते ४ अंडी घालते. १२ ते १४
दिवसांनी पिल्ले अंड्यातून बाहेर येतात.
Dr. Vidhin Kamble
Department of Zoology
Sangola College, Sangola
No comments:
Post a Comment