Sunday, December 4, 2022

सांगोला तालुक्यात नीलकंठ पक्षाचे दर्शन

फोटो - डॉ. विधिन कांबळे (Photo - Dr. Vidhin Kamble) 

 सांगोला तालुक्यात नीलकंठ पक्षाचे दर्शन

भारतभर अनेक राज्यात शुभ मानला जाणार निळ्या रंगाचा व  सुंदर पंखांचा अत्यंत देखणा पक्षी म्हणजे नीलकंठ किंवा निलपंख. भारतभर आढळणारा पक्षी असून माझ्या निरीक्षणानुसार नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात सांगोला सारख्या दुष्काळी तालुक्यात थंडीच्या दिवसात त्याचे दर्शन होत असते आणि याहीवर्षी हा पक्षी आपल्या तालुक्यात दाखल झाला आहे. नीलकंठ पक्ष्याला चास किंवा  तास पक्षीही म्हणतात. हा पक्षी कीटक भक्षी  असून एकटा-दुकटा माळरान,  वनराईत,  झाडांच्या फांद्या, तारेवर बसून आपल्या भक्षाची टेहळणी करीत बसलेला असतो. अनेक वेळा एकाच जागेवर तासंतास बसून भक्ष्यावर नजर ठेऊन झडप घालतो व पुनः त्याच जागेवर जाऊन बसतो. हापक्षी उंदीर, सरडे, छोटे सांपसुद्धा खातो. 

निळकंठला इंग्रजीमध्ये ‘इंडियन रोलर’ असे संबोधले जाते.  कबूतरच्या आकाराचा हा पक्षी ओरिसा, तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेशचा राज्यपक्षी आहे. तर महाराष्ट्रात तो वर्धा जिल्ह्याचा पक्षी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. भारताबरोबरच आपल्या शेजारील श्रीलंका,  पाकिस्तान, बांग्लादेश, म्यानमार या देशामध्ये ही नीलकंठ हा पक्षी आढळतो.

हवेत झेपावतान याचे पंख खूप सुंदर दिसतात.  पंखांच्या  खालची बाजूला  पांढरा, गडद निळा व फिक्कट  निळ्या रंगाचे पट्टे असतात. पाठ आणि छाती थोडी तपकिरी रंगाची असते. डोक्यावरची पिसे निळ्या रंगाची असून त्यांना  टोपीसारखा आकार असतो. पक्षीप्रेमींसाठी ही खऱ्या अर्थाने पर्वणी असून या पक्षाचे शुभ दर्शन घेण्याची संधी सांगोलकरना उपलब्ध झाली आहे. तसेच सांगोला तालुक्यात अनेक जलाशय सध्या पूर्ण क्षमतेने भरले असून पानथळीचे पक्षी पहाण्याची सुवर्णसंधी आहे.

प्रा. डॉ. विधिन कांबळे

प्राणिशास्त्र विभाग, सांगोला महाविद्यालय, सांगोला 

No comments:

पानपक्षी इंग्रजी नाव- Duskey warbler शास्त्रीय नाव- Phylloscopus fuscatus)

कोंडा पानाची चिमणी  / पानपक्षी  इंग्रजी नाव- Duskey warbler शास्त्रीय नाव - Phylloscopus fuscatus )   डस्की वॉर्बलर हा Phylloscopid...