Tuesday, December 15, 2020

परीट धोबी (इंग्रजी:wagtail,) Dr. Vidhin Kamble

परीट

 धोबी (इंग्रजी:wagtail,)

(शास्त्रीय नावः Motacilla alba)

धोबी पक्ष्याची वर-खाली होणारी शेपटी हे चे खास वैशिष्टय आहे. त्यामुळेच याला ‘परीट पक्षी’ सुद्धा संबोधतात. इंग्रजीमध्ये याला सतत शेपटी हलविणारा (wagtail) असा अर्थ होतो.

धोबी पक्षी हा स्थलांतरित पक्षी आहे. हिवाळ्यात पाणथळी जागांजवळ हा पक्षीसातत्याने पहावयास मिळतो. जसे,डबकी, दलदल, तलाव, ओढ्यानाल्याच्या काठाने,  अशा पाणथळ ठिकाणी दिसतो. सर्वसामान्यपणे त्यांना माणसांच्या आसपास राहायला आवडते. शहरांमधल्या बागांमध्ये देखील हा पक्षी दिसतो. शेताजवळ देखील अनेकदा दिसतो.  एकट्याने अथवा जोडीने आढळणारा हा पक्षी कीटकभक्षी असून  या जागी  किडे, चतुर, टोळ, नाकतोडे टिपत असतो. यात दोन रंग असतात एक करडा किंवा पांढरा धोबी आणि दुसरा पिवळा धोबी.


फोटो - डॉ. विधिन कांबळे (Photo - Dr. Vidhin Kamble) 

धोबी/परीट जसा खडकावर धुणे आपटत असतो त्या प्रमाणे हा पक्षी त्याची शेपूट धोब्याच्या धोपाटण्यासारखी खालीवर करत असतो. धोबी पक्ष्याच्या १२ उपप्रजाती आहेत. साधारण चिमणीएवढा असणारा धोबी पाणथळ जागी वर्षभर पहावयास मिळतो.  आपल्याला भागात पिवळा धोबी (Yellow wagtail), करड्या डोक्याचा धोबी(Grey-headed Wagtail), निळ्या डोक्याचा धोबी  (Blue-headed Wagtail)काळा-पांढराअसे चार प्रकारचे धोबी पक्षी जलाशयावर आवर्जून पहावयास मिळतात.

.    पांढरा-काळा धोब्याचे कपाळ, डोळे आणि चोच यामधील भाग, गाल, कानामागील भाग आणि डोक्याच्या बाजूचा भाग पांढऱ्या रंगाचे असतात. गळा हा काळा असतो. वरच्या भागातील काही दर्शनी भाग आणि वरील पंखाच्या आतला भाग करड्या रंगाचा असतो.कडेचे दोन पंख मात्र पांढरे शुभ्र असतात. चोच अगदी टोकदार आणि काळीशार असते. डोळे तपकिरी काळे असतात.  पिवळा धोबी हा आकाराने चिमणीएवढाच असतो. वरील भागाचा रंग हिरवट पिवळा असून शेपटीची किनार पाढरी असते. खालील भागाचा रंग पिवळा असतो. डोक्याचा रंग करडाअसतो. तर भुवईचा रंग पांढरा असतो. निळ्या डोक्याचा धोबीचे डोके निळसर राखी रंगाचे असते. त्याची भुवई ठळक पांढरी रंगाची असते.

या पक्ष्याचा आवाज मंजुळ असतो. तो वेगवेगळे पण आलाप घेतल्यासारखा आवाज असतो. आवाज खणखणीत असून उच्च टीपेतला असतो.’त्स्ली-वी’ आणि ‘त्स्ली-वीट’  असे लहान लहान आवाज पुन्हा पुन्हा काढत असतो. अगदी लहान म्हणजे ‘चीसिकचीसिक’ आणि कर्कश ‘चीझ्झिक’ असाही आवाज ऐकू येतो.

          विणीच्या हंगामात नरांचे रंग अधिक गडद होतात. या हंगामात बरेच नर दुसऱ्या नरांच्या मागे मागे धावतात व त्यांना हुसकावून लावताना पहावयास मिळतात. विणीच्या हंगामात धोबी पक्षी नदीच्या पात्रातल्या खडकावर पानवनस्पतींच्या आधारानं,भिंतीमध्ये, खडकाच्या फटींमध्ये असतात.मुळ्या, केस, लोकर, चिंध्या, सुतळी, दोऱ्या, सुकलेलं शेवाळ गवत, बारीक काटक्यांच्या सहायाने वाटीसारखं घरटंबांधतात.त्यामध्ये पिसे, लोकर किंवा केसांची मऊ गादी  तयार करतात

मादी एका वेळेस ३ ते ८ अंडीघालते. अंडी फिकट राखी रंगाची असून त्यावर त्याच गडद रंगाचे ठिपके असतात. मादीने अंडी घातल्यानंतर नर आणि मादी दोघे मिळून अंडी उबवण्याचे आणि पिल्लांना वाढवायचे काम करतात.उबवणी काळ १२ ते १५ दिवसांचा असतो.  पिले २ आठवड्यात पूर्ण वाढ होऊन स्वतंत्रपणे जगण्यास सक्षम होतात

No comments:

साळुंकी पक्षी : Indian mayna (Acridotheres tristis)

साळुंकी पक्षी  इंग्रजी नाव : Indian mayna   शास्त्रीय नाव : Acridotheres tristis फोटो - डॉ. विधिन कांबळे (Photo - Dr. Vidhin Kamble)  ...