Tuesday, December 15, 2020

पक्षी किती अंडी घालतात?

 पक्षी किती अंडी घालतात?

फोटो - डॉ. विधिन कांबळे (Photo - Dr. Vidhin Kamble) 

अनेक  वैशिष्ट्यापैकी अंडी घालणे हे पक्ष्यांचे  प्रमुख वैशिष्ट्य आहे. कोबडी, पाळीव बदक इत्यादी पक्षी कुकुटपालन व्यवसायासाठी वापरले जातात.  

अलीकडे  शहामृग पालन हा व्यवसाय पोल्ट्री व्यवसायासाठी उपयुक्त असल्याने मोठ्या प्रमाणावर विकसित होत असताना दिसते. हे पक्षी व्यवसायासाठी निवडण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांची अंडी घालण्याची प्रचंड क्षमता हे होय. 

पोल्ट्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या कोंबड्या वर्षाला २५० ते ३०० अंडी देतात. शहामृगाची मादी एका वर्षात ४० ते ६० अंडी घालते. शहामृगाचे अंडे सर्वात मोठे असून ७ इंच असते तर  वजन १.० ते १.५  किलोपर्यंत असू शकते.

हमिंग बर्ड हा सर्वात लहान पक्षी असून त्याचे अंडे हे आकाराने सर्वात लहान असते. हमिंगबर्ड चे अंडे १० मिमी पेक्ष्या लहान असून ०.३६ ग्रम एवढे वजन असते.

पक्ष्यांच्या बाबतीत  अंडी घालण्याचे  प्रमाण अत्यल्प असून पक्ष्यांचे विशिष्ठ विणीचे हंगाम असतात. व त्यानुसार पक्षी अंडी घालत असतात.  एका क्षेत्रात राहणारे एकाच जातीचे पक्षी घालीत असलेल्या अंड्यांची संख्या बहुतेक सारखीच असते. पक्ष्यांची अंडी घालण्याची क्षमता व प्रमाण पक्ष्यांच्या आकारमानावर अवलंबून नसते. 

बदके व लावासारखे पक्षी जास्त अंडी घालतात. लावा पक्षी २० पर्यंत किंवा जास्त अंडी घालतात. 

पेग्वीन आणि उष्ण प्रदेशातील कबुतरे एकच अंडे घालतात. शिंपी, कोतवाल, कावळा, सातभाई, ब्राम्हणी                मैना, खाटिक, टिटवी इ. पक्षी ३ ते ४ अंडी घालतात. 

भारद्वाज ४ ते ६ अंडी घालतो. धोबी ३ ते ८ अंडी घालतो.

धीवर / खंड्या एका खेपेला १० अंडी घालतो. टिटवी ४ अंडी घालते. 

राष्ट्रीय पक्षी मोर ६ अंडी घालतो.  आपली प्रजाती निसर्गात टिकून राहीली पाहिजे. त्यासाठीच  पक्षांचा हा खटाटोप असतो.

No comments:

पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे Mandesh for Bird Watchers and Travelers

                      पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे माण नदी खोऱ्यात येणाऱ्या भौगोलिक प्रदेशाला ‘ माणदे...