Tuesday, December 15, 2020

अंडी उबवण्यासाठी पक्षांना किती कालावधी लागतो?

अंडी उबवण्यासाठी पक्षांना किती कालावधी लागतो?

 पक्षी अंडी घालतात हे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक पक्षी विणीच्या हंगामात पक्षी घरटे बांधत्तात व त्यामध्ये अंडी घालतात.  अंड्यांची संख्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्या-त्या प्रजातीत सारखीच असते. अंडी घातल्यानंतर ती उबवण्याची खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते. अनेक वेळा आपण ग्रामीण भागात घरातच कोंबडी अंड्यावर बसवून २१ दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर पडताना अनेकांनी अनुभवले असेल.

अंड्यातील भ्रूणाची वाढ होण्याकरिता अंड्याला उष्णता पोहोचविणे आवश्यक असते. नर-मादी  अंड्यांवर बसून आपल्या शरीराची उष्णता अंड्यांना देत असतात.  विणीच्या हंगामात नर-मादी यांच्या त्वचेवर उबवण खंडकउत्पन्न होतात. हे खंडक म्हणजे पक्ष्यांच्या शरीरावरील ठराविक ठिकाणची पिसे गळून पडतात व त्या ठिकाणची त्वचा जाडसर होते. अशा ठिकाणी रक्ताचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होत असतो. ज्यायोगे पक्ष्यांच्या शरीराची उब अंड्याला मिळते व अंड्याची उबवण सुरु होते.

काही प्रजातीमध्ये नर-मादी मिळून अंडी उबवतात तर काही प्रजातीमध्ये मादी एकटी अंडी उबवण्याची जबाबदरी पार पडत असते. झाडावर सुंदर घरटे बांधणाऱ्या सुगरण पक्ष्याची फक्त मादीच अंडी उबवण्याचे काम करीत असते. प्रत्येक पक्ष्यांचा अंडी उबवून अंड्यातून पिले बाहेर पडण्याचा कालावधी हा  वेग-वेगळा असतो. निरनिराळ्या पक्ष्यांमध्ये अंडी उबविण्याचा काळ ११ दिवसांपासून सुमारे ३ महिन्यांपर्यंत असतो. बहुतांश गायक पक्ष्यांमध्ये अंडी उबवण्याचा काळ ११ ते १५ दिवस असतो. आपल्या आसपास आढळणाऱ्या काही पक्ष्यांना अंडी उबवण्यासाठी किती काळ लागतो हे आपण पाहू या.

आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी, मोराला अंडी उबवण्यासाठी २८ ते ३० दिवस लागतात. भारद्वाज  १४ ते १६ दिवस,  ब्राम्हणी मैना, कोतवाल, शिंपी  १२ ते १४ दिवस,  धीवर १९ ते २०, चीरक १० ते १२, साळुंकी १७ ते १८ दिवस.  शिक्र घार १८ ते २१ दिवस. परीट व धोबी  १२ ते १५ दिवस.  टिटवी २६ ते २८ दिवस, पानकावळा व बगळा ३ ते ४ आठवडे, हंस आणि बदके ४ ते ६ आठवडे, शहामृग पक्ष्याचे अंडे सर्वात मोठे असते. शहामृगाला अंडी उबवण्यासाठी ६ आठवडे. मात्र शिक्रा आणि गरुड या शिकारी पक्ष्यांना अंडी उबवण्यासाठी ४ ते ८ आठवडे असतो.

No comments:

साळुंकी पक्षी : Indian mayna (Acridotheres tristis)

साळुंकी पक्षी  इंग्रजी नाव : Indian mayna   शास्त्रीय नाव : Acridotheres tristis फोटो - डॉ. विधिन कांबळे (Photo - Dr. Vidhin Kamble)  ...