लेखक प्रा. डॉ . विधिन कांबळे (Dr. Vidhin Kamble)
(Brahminy
मैना किंवा Black headed मैना)
शास्त्रीय
नाव: Sturnus pogodarum
भारद्वाज Crow
Pheasant/Coecal )
शास्त्रीय नाव : Centropus Sinesis
पक्षी शेतकऱ्यांसाठी खूप
मोठे वरदान आहेत. पिंकासाठी हानिकारक असलेल्या अनेक जंतू व किडींचा मोठ्याप्रमाणावर
नायनाट करतात. पक्षी नसते तर जग उजाड झाले असते. कारण शेती, जंगले, बागा, उद्याने
अशा ठिकाणी, विविध प्रकारचे कीटक आढळून येतात की, जे वनस्पतींची पाने, फुले व
अंकुर, कुरतडून प्रचंड नुकसान करीत असतात. भारतात ३०,००० पेक्षा जास्त प्रकारचे
कीटक सापडतात. परंतु सर्वच किडे हे उपद्रवी नसतात. यातील अनेक कीटक मानवासाठी फार
उपयुक्त ठरतात. मानवी संसाधनाचे नुकसान करणाऱ्या किड्यांचा उत्पत्तीचा वेग
अतिप्रचंड असतो. त्यामुळे त्यांची संख्या वाढणे हे मानवी हिताच्या आड येणारे आहे.
या कीटकांची वाढ अनियंत्रित झाली तर झाडांचे पान न पान फस्त करतील. आपल्या
पृथ्वीचे उजाड वाळवंट होईल. अशा विनाशकारी कीटकांचा बंदोबस्त करण्याचे अत्यंत
महत्वाचे काम अनेक कीटकभक्षी पक्षी करीत असतात. आपल्या परिसरात आढळणारे पक्षी
पिकावर घाला घालणाऱ्या कीटकांचा फडश्या पडताना नेहमीच पहावयास मिळतात. चिमणी, पाकोळी,
पागोळी, सुतार, तांबट, साळुंकी मैना, बुलबुल, शिंपी, खाटिक, कोतवाल, हुदहुद,
शिंजीर, शिंपी इ. पक्षी विणीच्या हंगामात
लाखो कीटक फस्त करीत असतात. चिमणा-चिमणीचा एक जोड मिनटाला दोनदोनदा घरट्याकडे
येतात व किड्या-मुंग्यांनी भरलेल्या चोचीने आपल्या पिलांना घास भरवत असतात. घार, गरुड, ससाणा इत्यादी सारखे मांसाहारी
पक्षी शेतकऱ्यांना आवडत नाहीत कारण हे पक्षी कोंबडीची पिले पळवून नेतात. परंतु हेच
पक्षी पिकांची नासाडी करणाऱ्या उंदीर, घूस, खार, अशा प्राण्यांची शिकार करून नायनाट
करीत असतात. घुबडाला भारतात अशुभ मानले जाते. वास्तवात घुबड हे निशाचर असून
पिकांची व धान्याची प्रचंड नासाडी
करणाऱ्या उंदरांची अंधारात शिकार करून खातात व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळतात.
गिधाडे, घारी, कावळे इ. पक्षी मृत जनावरांचे मांस खाऊन परिसर
स्वच्छतेचे कार्य करीत असतात. त्यामुळे मानवी जीविताला होणारी संभाव्य रोगराई,
दुर्गंधी व साथीच्या आजारापासून संरक्षण करीत असतात. परागीकरण आणि बियांचा प्रसार
करण्यामध्ये पक्षी फार मोलाचे कार्य करीत असतात. सूर्यपक्षी व फुलचूकीसारखे पक्षी
फुलातील मध चाखण्याबरोबरच फुलांचे परागीभवनाचे कार्य करीत असतात. भारतात सर्वत्र
आढळणारे काटेसावर या झाडाचा, पक्ष्याच्या माध्यमातूनच प्रसार झाला आहे. काटेसावर
या झाडाशी जवळपास ५० ते ६० पक्ष्यांचा सबंध आहे. एकूणच पक्षी हे सर्वच स्तरावर
मानवाचे सोबती आहेत. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पक्षी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे हातभार लावत असतात.
Photo Dr. Vidhin Kamble
No comments:
Post a Comment