थिरथि-या पक्षी
फोटो - डॉ. विधिन कांबळे (Photo - Dr. Vidhin Kamble)
चिमणी
एवढ्या आकाराचा एकटा-दुकटा रहाणारा थिरथि-या म्हणजे ब्लँक रेड स्टार्ट हा नेपालसह हिमालयाच्या पर्वत राजीत वास्तव्यास
असणारा पक्षी हिमालयातील पर्वत बर्फाच्छादित झाल्यावर महाराष्ट्रासह दक्षिणेकडे
स्थलांतर करतो. तसाच तो फेब्रुवारी-मार्च
मध्ये सांगोल्यासह सोलापूर जिल्ह्यातही दाखल होतो. मार्च २०१८ मध्ये सांगोला तालुक्यातील
जवळा येथील म्हसोबा मंदिर परिसरात थिरथि-या आढळून आला होता. याही वर्षी मार्च
मध्ये बुधेहाळ तलावाच्या परिसरात तो आढळून आला. अकलूज येथील पक्षी निरीक्षक डॉ. अरविंद कुंभार यांनी मार्च २००९ व
२०११ मध्ये सयाजीराजे पार्क येथे आढळून आल्याची नोंद केली आहे. एकंदरीत थिरथीरा हा
पक्षी नित्यनेमाने हिमालयातून २ ते ३ हजार किमीचा प्रवास करून सोलापूर सारख्या दुष्काळी
भागात हजेरी लावत असल्याचे दिसून येते. ही पक्षी अभ्यासकासाठी महत्वाची बाब आहे.
थिरथि-या
हा पक्षी नावाप्रमाणेच कधीच स्थिर रहात नाही आपली शेपटी सतत हलवत असतो. बसल्या जागी कंप पावल्यासारखा थिरकत असतो. म्हणून
त्याला कंपन पक्षी असेही संबोधले जाते. थिरथीऱ्याचा
पोटाचा व शेपटीकडील भाग नारंगी असतो. डोके, छाती व पंख रंगाने काळे असतात. त्यामुळे याला कृष्ण थिरथिरा असेही
म्हटले जाते. मादी रंगाने नरापेक्षा फिक्कट रंगाची असते. जमिनीवर किडे व कोळी खाऊन
गुजराण करणारा हा पक्षी व्हीट- व्हीट असा आवाज करतो.
विणीचा हंगाम मे ते ऑगस्ट असून मादी ४ ते ६ फिक्कट निळसर रंगाची अंडी घालते.
हरते बनवण्यासाठी शेवाळ, लोकर, पिसे व गवताचा वापर केला जातो.
पक्षीप्रेमी
मंडळींनी आपल्या परिसरात बारकाईने निरीक्षण केल्यास विविध प्रकारचे सुंदर पक्षी
आपणास वावरताना दिसतील. त्याची नोंद जरूर ठेवावी.
प्रा.
डॉ. विधिन कांबळे
प्राणिशास्त्र
विभाग, सांगोला महाविद्यालय, सांगोला
No comments:
Post a Comment