Wednesday, February 5, 2020

. शिंपी Tailor bird -

शिंपी  
इंग्रजी नाव: Tailor bird
शास्त्रीय नाव: Orthotomus sutorius

फोटो - डॉ. विधिन कांबळे (Photo - Dr. Vidhin Kamble) 
शिंपी या पक्ष्याला स्थानिक भाषेत वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. लिचकूर, चिवळ, पाणशिव्या,  लहान सुई, लिट्या, लहान लिंबू इ.
शिंपी हा एखाद्या कुशल कारागीराप्रमाने पिशवी शिवावी त्याप्रमाणे, झाडाची २ किंवा ३  पाने एकत्र शिवून सुंदर घरटे घरटे शिवतो. म्हणून याला शिंपी किंवा टेलर बर्डअसे म्हणतात.
हा चिमणीपेक्षा लहान आकाराचा पक्षी आहे. याचा रंग वरून पोपटी-हिरवा तर खालून पांढुरका असतो. डोक्यावर लाल छटा, शेपटी लांब व निमुळती होत टोकदार असते. लांब व टोकदार चोच असा हा पक्षी आपली शेपटी नेहमी हलवत असतो.

शिंपी हे एकटे किंवा जोडीने आढळतात. हा गाणारा पक्षी असून ग्रामीण व शहरी भागात आढळणारा पक्षी, अंगणातील फुलझाडे, शेती परिसरातील झुडपे, पानगळतीची जंगले, बागा, इ. परिसरात आढळतो.  आशियाच्या उष्ण कटिबंधात आढळतो.  हे पक्षी फुलातील मकरंद पिताना आढळतात. त्यामुळे फुलझाडे त्याचप्रमाणे ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांच्या परागीभवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. शेतीसाठी उपयुक्तत असणारा पक्षी असून त्याच्या खाद्यामध्ये लहान कीटक व त्यांच्या अंड्यांचा समावेश असतो. हे पक्षी उसशेती मध्ये कीटक खातानाही आढळतात.

विणीचा हंगाम एप्रिल ते डिसेंबर हा असून असून झाडांची पाने, गवत, कोळ्याचे जाळे, कापसाचे धागे वगैरे साहित्य वापरून घरटे तयार केलेले असते. शिंप्याचे घरटे जवळ-जवळ असणाऱ्या दोन पानांचा वापर करून आपल्या टोकदार चोचीने पाने शिवून बनवलेले असते. हे घरटे इतके बेमालूमपणे शिवलेले असते की अन्य पानामध्ये हे घरटे मिसळून जाते व सहजी ते आपल्या दृष्टीस पडत नाही. नर-मधी दोघे मिळून घरटे बनवतात. घराच्या परिसरातील बागेमध्ये, मोठ्या पानाच्या झाडावर, आंब्याच्या झाडावर पाने शिवून अगदी खालच्या बाजूला बनवलेली घरटी आपल्याला पहावयास मिळतात. काहीसा पिची पिची पिची अशा आवाजमुळे आपले लक्ष्य मात्र वेधून घेतात. 
मादी एकावेळी निळसर पांढऱ्या किंवा लालसर पांढऱ्या रंगाची आणि त्यावर तपकिरी ठिपके असलेली, ३ ते ४ अंडी देते.अंडी उबविण्याचे काम एकटी मादी करते. १२ ते १४ दिवसांनी अंडी उबवल्यानंतर पिल्ले अंड्यातून बाहेर येतात. पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे नर-मादी मिळून करतात.साधारणतः २३ ते २५ दिवसात पिलांची वाढ पूर्ण होते व पिले घरट्यातून उडून जाण्यास सक्षम होतात.

No comments:

पानपक्षी इंग्रजी नाव- Duskey warbler शास्त्रीय नाव- Phylloscopus fuscatus)

कोंडा पानाची चिमणी  / पानपक्षी  इंग्रजी नाव- Duskey warbler शास्त्रीय नाव - Phylloscopus fuscatus )   डस्की वॉर्बलर हा Phylloscopid...