Friday, August 16, 2019

पक्ष्यांच्या हृदयाची स्पन्दने Heart Beats of Birds


पक्ष्यांच्या हृदयाची स्पन्दने


पक्षी हे हवेत उडणारे जीव असून त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन ची  जरुरी असते. स्नायुंना जलद गतीने  ऑक्सिजन मिळण्यासाठी अत्यंत गतीने रक्त पुरवठा होणे आवश्यक असते.  पक्षांचे  हृदय हे  सस्तन प्राण्याप्रमाणे उष्ण रक्ताचे असतात. रुधिराभिसरण तंत्राचे स्वरूप सस्तन प्राण्यांच्या तंत्रापेक्षा फारसे वेगळे नसते.  पक्ष्यांचे  हृदय चार क्प्प्यानी बनलेले असून सस्तन प्राण्यांच्या हृदयापेक्षा सापेक्षतेने मोठे असते. मोठ्या  पक्षापेक्ष्या लहान पक्ष्यांत ते सापेक्षतेने मोठे असते. 
हृदयापासून निघणाऱ्या महारोहिणी चापातून ऑक्सिजनमिश्रितरक्त पृष्ठमहारोहिणीच्या मार्गाने शरीराला पुरविले जाते.  संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा करण्यासाठी हृदय आकुंचन प्रसरण पावत असते.
पक्ष्यांचे हृदय अत्यंत वेगाने धडधडत असते. याची कल्पना बहुतेक लोकांना नसते.
निरोगी  माणसाच्या हृदयाचे  दर मिनिटाला ७२ ठोके पडत असतात हे आपणास माहित आहे. पक्ष्यांच्या  प्रत्येक प्रजातीमध्ये हे प्रमाण वेग-वेगळे असते.   लहान पक्ष्यांपेक्षा मोठ्या पक्ष्यांत ते कमी असतात. विश्रांती घेत असलेल्या काही प्रौढ पक्ष्यांच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला पुढे दिल्याप्रमाणे असतात.
पाळीव कोंबडी २४५, चिमणी ४६०,रॉबिन ५७०, कबूतर २१८,हमिंग बर्ड ६१५, होला पक्षी ५७० ,माशिमार  या छोट्याश्या पक्ष्याच्या हृदयाचे १००० हजार ठोके दर मिनिटाला पडत असतात.

घुबड १५० काही पक्ष्यांचे हृद्य हे अत्यंत सावकाश आकुंचन व प्रसरण पावत असते. कावळा ३४, टर्की ४३.शहामृग ४८ इ. पक्ष्यांच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला पडत असतात.

No comments:

पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे Mandesh for Bird Watchers and Travelers

                      पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी माणदेश साद घालतोय ! डॉ. विधिन कांबळे माण नदी खोऱ्यात येणाऱ्या भौगोलिक प्रदेशाला ‘ माणदे...