पक्षी संवर्धनाचा सांगोला पॅटर्न
उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे
तीन ऋतू सर्वानाच परिचीत आहेत. परंतू आता चौथा
ऋतू ‘दुष्काळ’ म्हणुन ओळखला जाबू लागला आहे. उन्हाळयात आणि दुष्काळात शेतकरी हवालदिल होतो, कारण शेती व जनारांसाठी पाणी व चार-पाण्याचा भीषण प्रश्न
निर्माण होतो.
शासन स्तरावर व विविध संस्था
जनावरंच्या चारा-पाण्याची व्यवस्था छावण्यांच्या माध्यमातून सोडवत असतात. परंतू आपल्या आसपास असण-या जीव-जंतूचा विचार
कोणी ही करताना दिसत नाहीत. कोरड
पडलेल्या चोचीने आपल्या घराच्या आसपास वावरणा- या पक्षांनी अशावेळी आपली तहान कशी भागवावी, याचा गंभीर विचार लोकांनी करावा "प्राणी मात्रांवर दया
करा" म्हणण्यापलीकडे कोणीही काही करत नाहीत. माणुस जगला पाहीजे. जनावरे जगली पाहिजेत. मग आपल्या अंगणात आणि परिसरात
वावरणा-या पशू पक्षांची होणारी तगमग का कोणाला दिसत नाही? आपल्या अंगणात एखाद्या कोप-यात पक्षासाठी चारा व पाण्याची सोय करण्यास का कोणी
धजावत नाही. हे लक्षात असू द्या.
जोपर्यत चिमणी कावळा जिवंत आहेत तो पर्यतच ही जीवसृष्टी आहे. हे सर्वानी लक्षात घेतेले पाहीजे. हा घास चिवूचा. हा घास काऊचा म्हणत आपल्या चिमुकल्यांना घास भरवत चिमणीलासुध्दा घास भरवण्याची आपली अलिखित परंपरा आहे. ती परंपरा आज
संपुष्टात आली आहे. कारण आता चिमणीचे दर्शनच दुर्लभ झाले आहे.
सांगोला तालका हा पिढ्यानं पिढचा दुष्काळी तालुका म्हणुन आळेखला जातो . वषार्न
वर्षे शेतीजनावरांसाठी छावण्या उभ्या केल्या जातात. त्यांच्या चा-याची व पाण्याची
सोय शासनपातळीवर केली जाते. विशेषतः उन्हाळयात पाण्याची भीषण समस्या निर्माण होते.
अशाही परिस्थितीत सांगोला तालुक्यातील शेतक-यांनी आपल्या सहनशीलतेचे दर्शन घडवले
असून डाळींबाच्या माध्यमातुन जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. पाण्याचे व
पिकांचे योग्य नियोजन करुन ताठ मानेने इथला शेतकरी जगत आहे. परंतु उन्हाळयाच्या
तीवृतेमुळे पिण्यास पाणी न मिळाल्याने चिमण्यांसारखे अनेक पक्षी उष्माषघाताला बळी
पडतात. अनेकांनी असे दृश्य अनेकवेळा
पाहीले असेल. परंतु मला ही गंभीर बाब वाटल्याने स्थानिक वर्तमानपत्रातून व
फेसबुकच्या माध्यमातून पक्षी संवर्धनासाठी उन्हाळयाच्या दिवसात अंगणात पक्षांसाठी
पाण्याची व्यवस्था करण्याविषयी आवाहन केले. माझ्या या आव्हानाला यश आले व बघता-बघता
शेकडो उत्साही मंडळी यामध्ये जोडले गेले. सामांन्याचे उद्बोधन करुन स्वतः
पक्षासाठी चारा, पाणी आणि
निवा-याची सोय आपल्या घराच्या अंगणात केली. त्याचबरोबर विद्यार्थ्याना प्रेरणा
मिळावी व प्रत्यक्ष दृष्टीस पडतील अशा त-हेने महाविद्याच च्या परीसरात
चिमण्यांसाठी लाकडी घरटी कायमस्वरुपी बसवण्यात आली. गेली ७ ते ८ वर्षे आपली पुढची पिढी वाढवण्यासाठी या घरट्यांचा वापर
चिमण्या व इतर पक्षी करीत आहेत. ही सर्वात महत्वाची व कौतुकाची बाब आहे.
विद्यार्थ्यानी आपआपल्या गावात चिमण्यासाठी सोय करण्यासाठी व प्रेरणा घेण्यासाठी
मी घराच्या परीसरातही पक्षासाठी चारा
पाण्याची व घरटयांची कायमस्वरुपी व्यवस्था केली. अंगणात येणा-या शेकडो पक्षांची
छायाचित्र टिपली. भारव्दाज, मैना, दयाळ, बुलबुल, ब्रामणी मैना, सातभाई, कोकीळा, चिमणी, चश्मेवाला होला इ. पक्षी नित्यनेमाने चारा व
पाण्यासाठी दिवसभर घराजवळ व महाविद्यालयाच्या परीसरात वावरत असतात. पक्षाबद्दल
जागृती होण्यासाठी चिमणीच्या नावाने Chiutai
Chimni या नावाने फेसबुक आकौट
उघडण्यात आले. तसेच Youtube वर vidhin
Kamble या नावाने काही व्हिडिओ सुध्दा
अपलोड केले.
आज माझ्या प्रयत्नाने शेकडो चिमण्या व
पक्षी महाविद्यालयाच्या परिसरात चिवचिवाट करताना ऐकून मन प्रसन्न होत. सांगोला
तालुक दुष्काळी असला तरी पक्षाच्या चारापाण्यची व्यवस्था अनेक लोक करत आहेत. या पक्षी
सवर्धनाच्या चळवळीत पत्रकार राजेंद्र यादव,
हास्यसम्राट जितेश कोळी, नागेश भोसले, व्यापारी महेश गवळी, सुनिल शिंदे, व्यापारी मयुर भंडारे, अनिल साखरे, प्रसिद्ध व्यापारी
वसंत फुले, सर्पमित्र संदेश पलसे, श्री. बागवान, चैतन्य कांबळे, अमेय मस्के, समाजसेवक कमरुद्दीन
खतीब, महेश गुरव, पर. अमोल पवार, प्रा. मालोजी जगताप, आदी मंडळी या पक्षी संवर्धनाच्या मोहीमेत काम करीत आहेत.
त्यामुळेच आज सांगोल्यासारख्या दुष्काळी भागात पक्षांचा चिवचिवाट ऐकावयास मिळणे ही
अत्यत मोलाची बाब आहे.
तालुक्याने अनेक पॅटर्न महाराष्ट्राला दिले आहेत. पेयजल योजना, डाळींब शेती, निर्मलग्राम अभियान, आशियाखंडातील गुणवत्तेत सर्वश्रेष्ठ सहकारी सुतगिरणी त्याच धर्तीवर
पक्षी सवर्धनाचा सांगोला पॅटर्न महाराष्ट्रातील लोकांनी स्विकारावा असे मत पत्रकार
राजेंद्र यादव मांडतात. सांगोला तालुक्यातील सामाजिक जाणिव असणा-या ४० ते ५०
लोकांनी एकत्र येवून आम्ही पक्षी प्राणिप्रेमी ग्रुपची स्थापणा नुकतीच केली आहे.
जगातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ‘तहान’ आणि ‘भूक’ ती शमविण्यासाठी
जगातील क्रोणताही प्राणि आणि माणुस कोणत्याही थराला जावू शकतो. हेच माध्यम
पक्षांना आपल्या अंगणात यायला भाग पाडते. यावर्षी उन्हाळयाची तिर्वता प्रचंड असून,
प्रत्येकाने आपल्या अंगणात पक्षांसाठी कमीत-कमी
पाण्याची तरी व्यवस्था करावी. वेळीच आपण सर्वानी लक्ष दिले तर शेकडो पक्षांचे
प्राण वाचतील. तरच आपण चिबू कावूच्या गोष्टी पुढच्या पिढीला सांगू शकू.
प्रा. डॉ. विधिन कांबळे
प्राणिशास्त्र विभाग,
सांगोला महाविद्यालय, सांगोला जि.
सोलापूर
No comments:
Post a Comment